ना मी मालक, ना संपादक
ना तारक, ना मारक मी
वेळेत येतो, वेळेत जातो
आज्ञाधारक अँकर मी.... //धृ//
चेह-यावरती थापुनी मेक-अप
वेळापत्रक करुनी चेक-अप
शिरतो मग मी स्टुडिओमध्ये
जंटलमनचा करूनी गेट-अप
अंगावरच्या कोटाआतील, भुलतो गंजीची भोके मी
हास्य आणतो ओठांवरी, कधी देतो भाव अनोखे मी
वेळेत येतो, वेळेत जातो......१
काय जाहले, जरी मी सध्या
घरात राही भाड्याच्या ?
खडसावूनी या जाब विचारी
अध्य़क्षाला म्हाडाच्या
स्टुडिओमध्ये गुरगुरतो, पण ऑफिसमध्ये शेळी मी
बाता करतो हापूसच्या अन्, घरात खातो केळी मी
वेळेत येतो, वेळेत जातो...... २
पटले वा, ना पटले तरीही
अंगावर घेतो व्हीआयपी
फिरून तरी माझीच मारती
इतुकाही ढळता टीआरपी
विकला गेलो तर मी श्रीफळ, ना विकता मग गोटा मी
प्रायोजक मिळता लेकुरवाळा, ना मिळता वांझोटा मी
वेळेत येतो, वेळेत जातो....... ३
माझ्यासाठी जरी ही भाकर, इतरा मदिरा फसफसली
बोल लावती तेच जयांची, चाखण्या जिव्हा आसुसली
आज्ञा येता विष ओकतो, होतो मिठ्ठाळ पेढा मी
बोलविता कोणी वेदही बोले, ज्ञानोबांचा रेडा मी
वेळेत येतो, वेळेत जातो,
आज्ञाधारक अँकर मी......... ४
अमोल जोशी.
जबरदस्त...सर्व वाहिन्यांच्या मालक, संपादकांना ही कविता आवर्जून मेल कर...आणि हो, बुलेटिन प्रोड्युसर्सना न चुकता !
ReplyDeleteतुझाच समदु:खी मित्र
पंकज इंगोले
Sahhi hai Amlya. Mhanje rojache dalan dalta daltahi tuzyatali Pratibha Shillak aahe mhanayachi. Bessst.!!!!!! Kiran Dahale
ReplyDeleteश्रद्धा आणि भक्तीचे मुक्त संमेलन म्हणजे माणूस!
ReplyDeletesundar jamliy!
ReplyDelete