Saturday, March 3, 2012

आज मै शुद्धीत हूँ |


बहुत दिनोंमें आज मै शुद्धीत हूँ,
होश है पुरा मुझे, चड्डीत हूँ |

रातमें कल की हुआ था झोल थोडा,
आया किडा, केला नरड्याचा बोळ ओला,
चोळला झंडू, पिळला लिंबू, सद्दीत हूँ
बहुत दिनोंमे आज मै शुद्धीत हूँ.......

ना माशूक मेरी डॉट डॉट आहे, बॉस भी नहीं बीप बीप
माजही convert  झाला, औकात भी हुई है zip
घ्या मला, मारा माझी, आपकी मुठ्ठीमें हूँ
बहुत दिनोंमें आज मै शुद्धीत हूँ |
  
मानता हूँ गुलजार सबका बाप है  
गालीबशी तुलना करू, क्या मेरी औकात है |
'धार' गेली, 'तार' गेली, खालच्या पट्टीत हूँ
बहुत दिनोंमें आज मै शुद्धीत हूँ  |

वचन माझे क्रांतीचे और बोलबच्चन रातके
एक मेमो, और हातमें आ जाती है फाटके
घबरा घबराकेही सबकी गट्टीत हूँ
बहुत दिनोंमें आज मै शुद्धीत हूँ |

                                          अमोल जोशी. 

5 comments:

 1. Sala ekdam ..... Zandu Baam Kavita Aahe........
  tu to abuddha hai par main Buddhit huin .......
  kaaran, bahut dino me aaj main Shuddhit Huin.......

  Gururaj

  ReplyDelete
 2. क्या कहूँ अमोल तुला मी
  शेर पढके धुंदीत हूँ
  बहुत दिन मे शायराना शुद्धीत हूँ...
  - दुर्गेश सोनार

  ReplyDelete
 3. भाषेची ही शुद्धीच अपेक्षित आहे..जोश्या कारण या शुद्धीला कुणी मेमो द्यायची गरज नाही...ज्याला कळणार नाही त्याला मात्र केमो घ्यायची गरज आहे...हे नक्की....जियो मेरे लाल..दिखा दे अपनी कविता का कमाल.....

  ReplyDelete
 4. मित्रा अशाच शुद्धीत असणं गरजेचं आहे...
  ज्या मेमोवल्यांना ही शुद्ध कळली नाही..
  त्यांना मेमो बरोबर केमो द्या..
  बहुत दिनों को बाद बुद्धि को शुद्धी मिली...
  क्या बात...क्या बात...क्या बात...

  ReplyDelete
 5. मित्रा! एकंदर सगळा सुन्नाट गोंधळच आपल्या आयुष्यात.. दारू प्यायल्यानंतरच दिव्य सत्याचं ज्ञान कसं झगझगीतपणे पुढं येतं.. This process of self realization is called as 'dutch courage'. म्हणजे दारूचा अंमल चढल्यानंतर वाढलेला आत्मविश्वास! आपलं दांभिकपण एवढ्या नागडेपणानं मांडायचं, म्हणजे आत्मविश्वासाचा डोसही तेवढाच लार्ज पाह्यजे. कवितेतला उपरोध एकदम टोचणारा आणि सत्याच्या चटक्यांनी पोळायला लागलं की, शरिराची झाकाझाक करण्यासाठी पुन्हा कपडे अंगावर चढवायला अगतिक करणारा.

  ReplyDelete